आमरस बनवण्यासाठी, आंब्याचे काढते साल, ___रावांच्या नावाने, कुंकू लावते लाल
जेवणात हवे दही, साखर, तूप, ____ मला आवडते खूप
कोकणच्या माणसांत, हापूस आंब्याची गोडी, ____आणि माझी, लक्ष्मी-नारायणाची जोडी
चटणीला दिला तडका, जिरे-मोहरीचा, ___राव आहेत जणू, हिरा कोहिनूरचा
रसाळ कलिंगडाचे, हिरवे हिरवे साल, ___रावांच्या नावाने, कुंकू लावते लाल
नाजूक अनारसे, तळले तुपात, काहीतरी जादू आहे, ___च्या रूपात
मस्त लागते आंबटगोड, संत्र्याची फोड, माझ्या ___ च बोलणं, मधापेक्षाही गोड
___ आणि माझं नातं, आंबा कैरीची फोड , आंबट वाटलं आधी जरी, पिकल्यावर मात्र गोड
भाजीत भाजी मेथीची, ___माझ्या प्रीतीची
आंब्याला आहे, फळांच्या राजाचा मान, __चे नाव घेतो, ऐका देऊन कान