___ आणि माझं नातं, आंबा कैरीची फोड , आंबट वाटलं आधी जरी, पिकल्यावर मात्र गोड
भाजीत भाजी मेथीची, ___माझ्या प्रीतीची
आंब्याला आहे, फळांच्या राजाचा मान, __चे नाव घेतो, ऐका देऊन कान
ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड, ___समोर माझ्या, सोनं सुद्धा लोखंड
द्राक्षाच्या वेलीला, त्रिकोणी पान, ___चे नाव घेतो, ऐका देऊन कान
शंकराच्या पिंडीला, नागाचा वेढा, __ माझी म्हैस आणि मी तिचा रेडा
दीन दुबळ्यांचे गाऱ्हाणे, परमेश्वरानी ऐकावे, ___रावांसारखे पती मिळाले, आणखी काय मागावे?
चहा गरम राहावा म्हणून, कपावर ठेवली बशी, __माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी
केस झाले पांढरे, तरी मिशी अजून काळी, माझ्या संसारवेलीचे __राव माळी
बघता बघता संसाराची, ___वर्षे लोटली, ___च्या सोबत मोठी संकटेही, सुपारी समान वाटली