डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल, ___रावांच्या नावाने, कुंकू लावते लाल

सौभाग्याचे अलंकार, मंगळसूत्राचे काळे मणी, ___राव आहेत, माझ्या कुंकवाचे धनी

लग्नामुळे जुळतात, सासर आणि माहेर, ___ व माझ्या लग्नाला आलात, हाच आमचा आहेर

बकुळीची फुले सुकली तरी, हरवत नाही गंध, ___रावांसाठी माहेर सोडले तरी, राहतील मनात स्मृतिबंध

आई वडीलांच्या वियोगाचे, दुःख ठेवून मनात, हसतमुखाने प्रवेश केला मी, ___रावांच्या जीवनात

आरतीच्या ताटात, अगरबत्तीचा पुडा, ___रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा

चांदीच्या दिव्यात लावली, प्रेमरूपी वात, ___रावांचे नाव घेऊन करते, सहजीवनाची सुरूवात

आमच्या दोघांच्या जोडीला, आशीर्वाद तुमचा हवा, ___रावांसोबत, संसार थाटेन नवा

अक्षता पडताच, अंतरपाट होतो दूर, ___रावांमुळे सौभाग्यवती झाले, सांगतात सनईचे सूर

सगळ्या रुढी परंपरेत आहेत, विज्ञानाचे धागेदोरे, ___सह घेतले मी, सप्तपदीचे फेरे