रसाळ कलिंगडाचे, हिरवे हिरवे साल, ___रावांच्या नावाने, कुंकू लावते लाल

पिवळं सोनं, पांढरी चांदी, ___ने काढली, माझ्या नावाची मेंदी

अलंकारात अलंकार, मंगळसूत्र मुख्य, ___रावांचा आनंद, हेच माझे सौख्य

हिंदवी स्वराज्य स्थापन केले, छत्रपती शिवाजी महाराजांनी, ___ आणि माझ्या संसाराची सुरुवात, करतो तुमच्या आशीर्वादांनी

मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार, __रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार

कुंकू लावते ठळक, हळद लावते किंचित, __राव झाले पती, हेच माझे पूर्वसंचित

मंगळसूत्रातील दोन वाटया, सासर आणि माहेर, __रावांनी दिला मला, सौभाग्याचा आहेर

उगवला सूर्य, मावळला शशी , ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध, __शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध 

लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा , तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?