हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

___च्या दिवशी, दारावर बांधले तोरण, ___रावांचे नाव घ्यायला, कशाला हवे कारण?

उगवला सूर्य, मावळला शशी , ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची __च नाव घेते, सून मी __ची

___ची आरास, सर्वांना पडली पसंत, ___रावांमुळे फुलला, जीवनी वसंत 

माझ्या सुंदर हास्यामागे __चाच हात, __चा लाडू खाता खाता, तुटला की हो दात

औषधं आपली सुरूच असतात, दिवाळी असो वा होळी , __रावांना भरवते प्रेमाने, __ची गोळी

सुख-समाधान असेल, तिथे लक्ष्मीचा वास, __रावांना देते, मी __चा घास

नऊवारी साडीवर, शोभून दिसते ठुशी, ____रावांचे नाव घेते, ____च्या दिवशी

आला आला ___चा, सण हा मोठा, ___राव असताना, नाही आनंदाला तोटा