स्त्रियांकरिता मंगळागौर पूजेसाठी उखाणे | Marathi Ukhane for Mangalagaur pooja
श्रावणातीळ मंगळवारी देवी गौरीला पुजून साजऱ्या केल्या जाणाऱ्या मंगळागौरीला वैवाहिक आनंद, समृद्धी आणि कल्याणाचे प्रतीक मानले जाते. लग्न झाल्यावर पहिली मंगळागौर म्हणजे तर आनंदाचा उत्सवच. मंगळागौर म्हणजे फक्त पूजा नाही हं, ती असते स्नेह, नात्यांची आणि धमाल मस्तीची गोड आठवण! हातात हिरव्या बांगड्या, ओवाळणीच्या साड्या, आणि आजीपासून लहानपणीच्या मैत्रिणींपर्यंत सगळ्यांनी एकत्र येऊन घातलेलया फुगड्या, झिम्मा, रसवंती ओव्या, खेळ आणि उखाणे – नुसता गोंधळ आणि खूप सारी मज्जा!
मंगळागौर अनुभवली की लक्षात येतं की– विविध सण आणि पूजा म्हणजे केवळ परंपराच नाहीत, तर आपल्या संस्कृतीचं हसतं-खेळतं रूप आहे! चला तर मग मंगळागौरीसाठीचे काही खास उखाणे बघूया.