नमस्कार मित्रमंडळींनो,

नवीन नवीन लग्न झाल्यानंतर मुलींसाठी अवघे विश्वच बदलते. नवे घर, नवी नाती आणि नवी हळवी प्रीती. अशा वेळी नव्या वातावरणाशी जुळवून घेताना एका बाजूला माहेरची ओढ, तर दुसऱ्या बाजूला फुलणाऱ्या नात्यांचा ओहोळ.

पण प्रेमळ जोडीदाराची साथ असेल, तर सर्व काही सोपे होऊन जाते. म्हणूनच आम्ही सादर करत आहोत, नव्या लग्नाची नवलाई सांगणारे खास मराठी उखाणे.

हे उखाणे कसे घ्याल?

अगदी सोप्पं आहे. फक्त रिकाम्या जागी तुमच्या जोडीदाराचे नाव घ्या. एवढंच! आहे की नाही सोप्पं?

चला तर मग, उखाणे बघूया.

वडिलांची माया, आणि आईची कुशी, ___रावांचे नाव घेते, ___च्या दिवशी

सर्वजण एकत्र जमलो, म्हणून आजचा दिवस खास, ___रावांचे नाव घेण्याची, लागली मला आस

‘नांदा सौख्यभरे’ दिला सर्वांनी आशीर्वाद, ___चे नाव घेते, द्या _____ (पूजेचे नाव) चा प्रसाद!

एकाच सोसायटीत राहून, झाले आमचे प्रेम, माझ्या नावापुढे अखेर, ___रावांचे लागले Surname

पहिल्या वर्षी वटपूजा, थाटामाटात केली, रूप पाहून माझे, ___रावांची स्वारी खुश झाली

निसर्गाचे सारे रंग, भरलेत तुझ्यात देवाने, ___ घरी आली, लक्ष्मी या रूपाने

यमुनेच्या डोहात, कृष्ण वाजवितो पावा, ___रावांचा आणि माझा, संसार सुखाचा व्हावा

मथुरा नगरी झाली दंग, पाहून कृष्णाची खोडी, ___रावांचे नाव घेते, आवडली का आमची जोडी?

अंगणातल्या तुळशीला घालते, पळी पळी पाणी, आधी होते आई वडीलांची तान्ही, आता झाले ___रावांची राणी

महादेवाची मनोभावे, सेवा करतो नंदी, ____रावांच्या प्रेमामुळेच तर, रंगते माझी मेंदी