राहतो आम्ही प्रेमाने, पूनव असो वा अवस, ___रावांचे नाव घेते, बघून ___चा दिवस
निसर्गरूपी आकाशाला, सूर्यरूपी माळी, ___रावांचे नाव घेते, ___च्या वेळी
ताटांपुढे काढते, रांगोळी क्रमाक्रमाने, ___रावांचे नाव घेते, तुमच्या इच्छेप्रमाणे
फुलापानांची रांगोळी, काढली आज दारी, _____रावांसोबत करते मी, _____पूजेची तयारी
_____ला नेसली, साडी नऊवारी, _____ व माझी जोडी, आहे सगळ्यांत भारी
पेटलेल्या होमात, दुःख-चिंता सारे जळते, ___रावांचे नाव घेऊन, _____ देवाला ओवाळते
संसाराच्या रथाचे, प्रेम आणि विश्वास सारथी, _____रावांसोबत करते, मी _____ची आरती
गोपिकांना करते धुंद, कृष्णाची बासरी, ___ रावांचे नाव घेते, ___ (पूजेचे नाव) आहे सासरी
सरस्वतीच्या मंदिरात, साहित्याच्या राशी, ___रावांचे नाव घेते, ___ च्या दिवशी
पांढऱ्या शुभ्र भातावर, पिवळं धमक वरण, ___रावांच नाव घेते, _____पूजेचे कारण