वारुळाला जाऊन मी नागाची पूजा करते, ___रावांचे नाव घेऊन, सौभाग्याचा आशीर्वाद मागते

अधिकमासात आईने दिली, चांदीची कळशी, ___रावांचे नाव घेते, ___पूजेच्या दिवशी

अलिबाबाने गुहा उघडली, म्हणून खुल जा सिम सिम, ____ चं नाव घेताच पडतो, मनी पाऊस रिमझिम

पावसाच्या पहिल्या सरीसाठी, झुरते चातकपक्षाची काया, ___ रावांमुळे मिळाली, सासरी सर्वांची माया

सौख्याच्या वाऱ्यासंगे, आनंद मेघ आले, __रावांच्या संसारात, मी अमृतात न्हाले

नीलवर्णी आकाशातून, पडती पावसाच्या सरी, ___चे नाव घेते, ___च्या घरी

वरुणराजा वरुणराजा, पाऊस येऊ दे  जोरात, ___रावांचे नाव घेते, ___च्या घरात

श्रावणात असतो, रोज नवीन सण, ___ला सुखी ठेवण्याचा, घेतलाय मी पण

हिरव्यागार रंगाने, श्रावणात सुष्टी सजली, ___रावांच्या नावाने, मी मंगळागौर पुजली

श्रावण मासात, सृष्टी पांघरते हिरवी शाल, ___माहेरी गेली की, होतात माझे हाल