मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध, __शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध
हिरवाईचा शालू नेसून, येतो श्रावण महिना, ____रावच आहेत, माझा खरा दागिना
श्रावणातल्या मंगळवारी, पूजते मंगळागौर, ____रावांसारखे पती मिळाले, भाग्य माझे थोर
श्रावण महिना सुरु होताच, सणांची होते लगबग सुरु, ____राव आहेत इतके छान, कौतुक तरी किती करू?
श्रावण महिन्यात, सृष्टी होते हिरवी, ____रावांची गाते, मी उखाण्यातून थोरवी
श्रावणात येते, सुंदर पर्जन्यधारा, ___रावांचे नाव घेते, ___ आहे घरा
श्रावणानंतर वाजतगाजत, येतात गौरी गणपती, ___राव आहेत, खूपच प्रेमळ पती
बरसला पाऊस, दरवळली माती, __रावांसोबत, फुलली नवीन नाती
मेघ मल्हार रंगातच, श्रावणसर कोसळते, __ च्या नावाने माझे, जीवनपुष्प बहरते
श्रावणात आकाशात, कडकडतात विजा, __रावांसोबत करते, __ची पूजा