अर्जुनाच्या रथाचे, श्रीकृष्ण सारथी, ____रावांचे नाव घेऊन, करते ____ ची आरती
___देवा / देवी, करते मी तुझी भक्ती, ___रावांसोबत राहू दे, तुझ्या आशीर्वादाची शक्ती
__च्या देवळाला, सोन्याचा कळस, __रावांचे नाव घ्यायला, मला नाही आळस
__च्या दर्शनाला लागतात, लांबच लांब रांगा, __रावांचे नाव घ्यायला, मला कधीही सांगा
___ची आरास, सर्वांना पडली पसंत, ___रावांमुळे फुलला, जीवनी वसंत
___ च्या आशीर्वादाने, आला भाग्याचा दिवस, ___रावांसाठी, मी केला होता नवस
___पुढे मांडले, प्रसादाचे ताट, ___मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट
श्रावणानंतर वाजतगाजत, येतात गौरी गणपती, ___राव आहेत, खूपच प्रेमळ पती
___च्या समोर, ठेवले केशरी पेढे, ___रावांचे नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे ?
___च्या समोर, फुलांचे सडे, ___रावांचे नाव घ्यायला, मी नेहमी पुढे!