संध्याकाळच्या आकाशाचा, पिवळा-केशरी रंग, ___माझी नेहमी, घरकामात असते दंग

चांदीच्या कढईत, सोन्याचा झारा, ___चा स्वभाव, मला खूपच प्यारा

नंदनवनात आहेत, अमृताचे कलश , ___माझी आहे, खूपच सालस

चांदीच्या किचन मध्ये, सोन्याचा ओटा, __सोबत असताना, नाही आनंदाला तोटा

ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस, __तू मला, सुपरवूमन वाटतेस

श्रावण मासात, सृष्टी पांघरते हिरवी शाल, ___माहेरी गेली की, होतात माझे हाल

लहान-सहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त,  __आल्यापासून  झालंय, आयुष्य खूपच मस्त!

खमंग चिवड्यात घालतात, खोबऱ्याचे काप, __ रावांचे नाव घेऊन, ओलांडते मी माप