निसर्गाचे सारे रंग, भरलेत तुझ्यात देवाने, ___ घरी आली, लक्ष्मी या रूपाने
लक्ष्मी शोभते दानाने, विद्या शोभते विनयाने, ___रावांच्या जीवावर, मी राहते मानाने
कमळात उभी लक्ष्मी, मोरावरती सरस्वती, ___रावांचे नाव घेते, खरी मी भाग्यवती
__च्या देवळाला, सोन्याचा कळस, __रावांचे नाव घ्यायला, मला नाही आळस
कोकणच्या माणसांत, हापूस आंब्याची गोडी, ____आणि माझी, लक्ष्मी-नारायणाची जोडी
__च्या दर्शनाला लागतात, लांबच लांब रांगा, __रावांचे नाव घ्यायला, मला कधीही सांगा
सुख-समाधान असेल, तिथे लक्ष्मीचा वास, __रावांना देते, मी __चा घास
मनाच्या गाभाऱ्यात, __ची मूर्ती, अशीच वाढत राहो देवा, __रावांची कीर्ती
शंकराला बेल, विष्णूला तुळस, __रावांचे नाव घ्यायला, कसला हो आळस!