सरस्वतीच्या मंदिरात, साहित्याच्या राशी, ___रावांचे नाव घेते, ___ च्या दिवशी

फुटता तांबड पूर्वेला, कानी येते भूपाळी, ___ रावांचे नाव घेते, ___ च्या वेळी

भक्ती तेथे भाव, भाव तेथे कविता, ___च्या नावाचा, जप करतो येता-जाता

अक्षता पडताच, अंतरपाट होतो दूर, ___रावांमुळे सौभाग्यवती झाले, सांगतात सनईचे सूर

मराठीत आहेत, खूप सुंदर सुंदर म्हणी, ___रावांचे नाव घेते, गृहप्रवेशाच्या क्षणी

जीवनरूपी काव्य, दोघांनी मिळून वाचावे, ___रावांच्या प्रेमाचे भाग्य, मला जन्मोजन्मी लाभावे

पेटी वाजे तबला वाजे, मंजुळ वाजे बासरी, ___च्या रूपाने सप्तसुरांना, साथ मिळाली हसरी

कवीची कविता मनापासून वाचावी, ___रावांच्या प्रेमाची फुले, ओंजळीने वेचावी

मनाच्या कप्प्यात, प्रेमाची लेखणी, ___माझी दिसते, सगळ्यात देखणी

मस्त लागते आंबटगोड, संत्र्याची फोड, माझ्या ___ च बोलणं, मधापेक्षाही गोड