___च्या मंदिराला, सोन्याच्या कळस, ___ राव आहेत, सर्वांपेक्षा सरस

मराठी भाषा आहे, महाराष्ट्राची अस्मिता, ___राव माझे श्रीराम, आणि मी त्यांची सीता

द्वारकेत कृष्ण, अयोध्येत राम, ___रावांचे चरण, हेच माझे चारही धाम

हाताने करावे काम, मुखाने म्हणावे राम, ___रावांचे चरण, हेच माझे चारधाम

राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, दशरथाला पुत्र चार, ___रावांनी घातला मला, मंगळसूत्राचा हार

द्वारकेत श्रीकृष्ण, अयोध्येत राम, ___रावांच्या सेवेमध्ये, मला मिळती चारही धाम

__च्या देवळाला, सोन्याचा कळस, __रावांचे नाव घ्यायला, मला नाही आळस

सीतेसारखे चारित्र्य, रंभेसारखे रूप,  ___च्या सोबत, मी आनंदी आहे खूप 

रामाने सीतेसाठी, उचलले शिवधनुष्य, ____रावांसाठी मागते, देवाकडे दीर्घायुष्य

दशरथ राजाला, पुत्र होते चार, ____रावांनी घातला, मला मंगळसूत्राचा हार