चिकनच्या तंगडीला, तंदूरचा स्वाद, ___च्या प्रेमाचा, लागला मला नाद

मारी ची बिस्किट्स आणि सोसायटी चा चहा, माझे नाव घेताना ___, किती लाजते पहा

साताऱ्याहून आणला, स्पेशल खवा, ___चा सहवास, मला रोज रोज हवा

गरम गरम ब्रेड वर, वितळते जसे बटर, ___ला पाहताक्षणी, उघडले मनाचे शटर

राहतो आम्ही प्रेमाने, पूनव असो वा अवस, ___रावांचे नाव घेते, बघून ___चा दिवस

संसाराच्या करंजीत, प्रेमाचे सारण, _____रावांचे नाव घेते, _____दिवसाचे देऊन कारण

आजोबा झालो तरी, मी अजूनही हिरो दिसतो, तुमच्या आजीकडे प्रेमाने, एक टक बघत बसतो

डासामुळे होतो, डेंगू आणि मलेरिया, ___ला पहिल्यांदा बघताच, झाला मला लवेरिया

एकाच सोसायटीत राहून, झाले आमचे प्रेम, माझ्या नावापुढे अखेर, ___रावांचे लागले Surname

तिला बघताच 'दिल मे बजी घंटी', ___माझी बबली आणि मी तिचा बंटी