सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर शिवाय, कंप्युटर काही चालत नाही, ____शिवाय आता, मन अजिबात रमत नाही
शिसवाचा पलंग, मखमलीची गादी अन मऊ मऊ उशी, मी गेले ___ रावांपाशी, तर राव म्हणतात आज एकादशी
जरीची साडी नेसलीस की, दिसतेस खूपच सुंदर, करीना , कतरिना राहिल्या मागे, ___चाच पहिला नंबर
प्रेमाच्या प्रवासात, पास केल्या सर्व टेस्ट, सर्व विषयांत ___ला, मार्क्स मिळाले बेस्ट
सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी लंच, ___चं नाव घेताच, मनी उठतात रोमांच
इडली नको, डोसा नको, नको वडापाव, मला आवडतात फक्त, माझे गोड गोड ___राव
__व माझी Lovestory एकदम सच्ची, गुलूगुलू करायला, गाठतो आम्ही गच्ची
राधेशिवाय कृष्णाला, उरणार नाही अर्थ, ___शिवाय माझं, जीवनच व्यर्थ
शंकरासारखा पिता, पार्वतीसारखी माता, ___राणी मिळाली, स्वर्गसुख आले हाता
मी सावळा ग कान्हा, तुझं अप्सरेच रूप, ___वर मी मनापासून, प्रेम करतो खूप