पौर्णिमेचा चंद्र, आकाशात दिसतो साजिरा, ___वर शोभून दिसतो, सुगंधी मोगऱ्याचा गजरा
नभांगणी दिसे, शरदाचे चांदणे, ___चे रूप, आहे खूपच देखणे
स्वप्नातला राजकुमार, आला घोड्यावर बसून, __रावांचे नाव घेते, त्यांच्याच बाजूला बसून
गालावर खळी, डोळ्यात धुंदी, __मुळे झाले, आयुष्य सुगंधी
पाहताक्षणी चढली, प्रेमाची धुंदी, __मुळे झाले, जीवन सुगंधी
गोड गोड पुरणपोळीवर, घ्यावे भरपूर तूप, __वर माझे, प्रेम आहे खूप खूप
गुलाबी प्रेमाने बनला, प्रेमाचा गुलकंद, __च्या नावातच, सामावलाय माझा आनंद
झाले आता वय, जवळ आली साठी, शंभरी नक्की गाठेन, __चे प्रेम असता पाठी
मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं, माझं मन रोज नव्याने, __च्याच प्रेमात पडतं
कधीही फोन केलात तरी, लाईन लागेल व्यस्त, _च्या प्रेमात, मी बुडलोय जबरदस्त