लग्नाच्या वाढदिवसाचे मराठी उखाणे । Marathi Ukhane on Wedding / Marriage Anniversary

नमस्कार चिरतरुण मित्रमंडळींनो,

आज आम्ही खास लग्नाच्या वाढदिवसाला घेता येतील असे उखाणे घेऊन आलो आहोत.

हे उखाणे लग्नाला काहीच वर्षे झालेल्या तरुण जोडप्यापासून अगदी वयाची साठी ओलांडलेल्या चिरतरुण जोडप्यापर्यंत सर्वांना घेता येण्यासारखे आहेत. आता तुम्ही म्हणाल, “म्हातारपणी कसले आलेत उखाणे? अहो आमच्या नातवंडांची लग्नाची वयं झाली. जाड भिंगाचा चष्मा आला, गुडघ्याच्या वाट्याही झिजल्या, कवळीही येईल लवकरच. आता कसले उखाणे आणि कसलं काय!”

अरेरे.. काय हे तुमचे विचार! वय झालं म्हणून काय झालं, अहो म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण. देवाने पुन्हा एकदा मौजमजा करण्याची दिलेली नामी संधी. मग आता घ्या ना बिनधास्त जगून!

सगळे दिवस मस्त साजरे करा. लग्नाच्या वाढदिवसाला हे उखाणे घेऊन तुमच्या जोडीदाराला परत तरुणपणीच्या दिवसांची आठवण करून द्या.

शेवटी, तुम्ही केवळ शरीराने तरुण असण्यापेक्षा, मनाने किती चिरतरुण आहेत हे महत्वाचं, हो ना?

काय मग? घेणार ना हे उखाणे?

हे उखाणे कसे घ्याल?
स्त्रिया आणि पुरुष, असे दोघेही हे उखाणे घेऊ शकतात. तुम्ही तर इतक्या वर्षांमध्ये उखाण्यांची पारायणं केली असतील. त्यामुळे उखाणे कसे घ्यायचे हे आम्ही नव्याने काय सांगणार? चला तर मग, उखाणे बघूया.