मारी ची बिस्किट्स आणि सोसायटी चा चहा, माझे नाव घेताना ___, किती लाजते पहा
साताऱ्याहून आणला, स्पेशल खवा, ___चा सहवास, मला रोज रोज हवा
लाल लाल डाळिंब, गोड गोड लागते, ___चे नाव घेताना, छान छान वाटते
दही चक्का तूप, ___आवडते मला खूप
तिळासोबत गुळाचा, गोडवा किती छान, ___रावांचे नाव घेऊन, देते संक्रांतीचे वाण
घर असावं नेहमी, Clean and Neat, ___आहे माझी, Simple and Sweet
संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा, मी घातला पसारा तर, ___ने तो आवरायचा
गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ___आहे, सेल्फी क्वीन
गच्चीवर गच्ची, सिमेंटची गच्ची, ___माझी बायको, आहे मोठी लुच्ची
एक बाटली दोन ग्लास, ___माझा, फर्स्ट क्लास