उंदीर राहतो, ती जागा असते बीळ , घायाळ करतो ___च्या, गालावरचा तीळ
भाजीत भाजी मेथीची, ___माझ्या प्रीतीची
चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ, ___चं नाव घेतो, पुढचं नाही पाठ
सोन्याचा मुकूट, जरीचा तुरा, ___माझी, कोहिनूर हिरा
साजूक तुपात, नाजूक चमचा, __रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा
आम्हा दोघांची, स्वर्गात बांधली गाठ, _____रावांचे नाव मला, अगदी तोंडपाठ
डाळीत डाळ, तुरीची डाळ, ___च्या मांडीवर खेळवीन, एका वर्षात बाळ
गालावर खळी, डोळ्यात धुंदी, __मुळे झाले, आयुष्य सुगंधी
चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ, __चं नाव घेतो, पुढचं नाही पाठ
एक दोन तीन चार, ____वर आहे, माझे प्रेम फार