नवे घर, नवे लोक, नवी नवी नाती, संसार होईल मस्त, __राव असता सोबती

चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा , ___रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा

दशरथ राजाला, पुत्र होते चार, ____रावांनी घातला, मला मंगळसूत्राचा हार

छन छन बांगड्या, छुम छुम पैंजण, ___रावांचे नांव घेते, ऐका पाहू सारे जण

नव्या नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी, __माझा राजा आणि मी त्याची राणी

केळीच्या पानांवर, कोवळं कोवळं ऊन, ___रावांचे नाव घेते, ___ची सून

आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा, __ च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा!

शंकराच्या पिंडीवर, बेलाचे पान, __रावांचे नाव घेते, राखून सर्वांचा मान

लग्नात घातले, हार आणि तुरे, ____रावांचे नाव घेते, चिडवणं आता पुरे

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,  ___झाली, आज माझी गृहमंत्री