बारसे उखाणे | Barse Ukhane
बारसे म्हणजे घरातल्या गोंडस पाहुण्याचं – आपल्या लाडक्या बाळाचं, पहिलं औपचारिक स्वागत! नाव ठेवायचा हा सोहळा म्हणजे आनंद, कौतुक आणि आशीर्वादांनी भारलेला खास क्षण. आजोबा एक नाव सुचवतात, आत्या दुसरंच नाव गोड मानते, आणि शेवटी सगळ्यांचं एकमत होऊन बाळाचं नाव प्रेमाने घोषित करण्याचा दिवस येतो.
बारश्याच्या दिवशी बाळच घरातलं सेलेब्रिटी असतं! सर्वांची नजर त्याच्यावरच! सर्व नातलग उत्सुकतेने एकाच गोष्टीची वाट पाहत असतात – “बाळाचं नाव काय ठेवणार?” आनंदाने भरलेल्या घरात रंगीबेरंगी फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेल्या झोपाळ्याच्या बाजूला “आईसारखं दिसतंय की बाबांसारखं?” पासून “डॉक्टर होणार की इंजिनिअर” पर्यंत विविध चर्चाना ऊत येतो.
आणि मग बाळाचं नाव घेताच सर्वांचे चेहरे आनंदाने फुलतात. खरंच, बारसं म्हणजे फक्त नाव ठेवणं नाही, तर ते नाव प्रेमानं सगळ्यांच्या हृदयात कोरणं!
अशा वेळी नव्या नव्या आई बाबांना उखाणे घेण्याचा आग्रह तर होणारच! चला तर मग खास बारश्यासाठीचे उखाणे बघूया.
स्त्रियांसाठी / आईसाठी बाळाच्या बारशाचे खास मराठी उखाणे । Marathi Ukhane for Mothers on Barse / Naming Ceremony /बारसे
1
बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने, आनंदले घर,
___रावांच्या संसारात, पडली नवी भर
Balachya hasarya praveshane, anandale ghar,
___ravanchya sansarat, padli navi bhar
2
___आणि बाळाची, काळजी घेतो मी Full,
प्रॉमिस करतो आज सर्वांना, डॅडी होईन मी Cool
___ aani balachi, kalaji gheto mi full,
Promise karto aj sarvanna, daddy hoein mi cool
3
काऊ चिऊचे घास, प्रेमाने भरवायची आई,
__मुळे कानी पडू लागली, परत नव्याने अंगाई
Kau chiuche ghas, premane bharvayachi ai,
___mule kani padu lagali, parat navyane angai
4
सोन्याचे घुंगरू, चांदीच्या वाळा,
सोनार घडवी दागिने, ___रावांच्या बाळा
Sonyache Ghungaroo, chandichya vala,
Sonar ghadavi dagine, ___ravanchya bala
5
बनारसी शालूला, आहेत जरतारी काठ,
___च्या मुलीच्या बारश्याचा, केला मोठा थाट
Banarasi shalula, ahet jartari kath,
___chya mulichya barashyacha, kela motha that
6
गोंडस बाळ व्हावे म्हणून, केला आम्ही नवस,
___ रावांच्या मुलीचा, आज बारश्याचा दिवस
Gondas bal vhave mhanun, kela amhi navas,
___ravanchya mulicha, aj barashyacha divas
7
बाळाच्या नाजूक गालावर, पडते इवलीशी खळी,
___रावांच्या संसारवेलीवर, उमलली नाजूक कळी
Balachya najuk galavar, padate ivlishi khalee,
___ravanchya sansar-velivar, umalali najuk kalee
8
बाळाच्या आगमनाने, दरवळला परिसर,
___ रावांच्या सहवासात, जीवन होईल सफल
Balachya agamanane, daravalala parisar,
___ravanchya sahavasat, jivan hoil safal
9
फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे,
___रावांच्या बाळाचे, आज आहे बारसे
Phulanchya sodalya mala, jagojagi lavale arase,
___ravanchya balache, aj ahe barse
10
लहान मुलं म्हणजे, देवाघरची फुलं,
___वर गेली आहेत, आमची दोन्ही मुलं
Lahan mula mhanje, Devagharachi phula,
___var geli ahet, amchi donhi mula
.
11
घरट्यात चिवचिव, करते पाखरू,
___रावांच्या घरी, आले गोड वासरू
Gharatyat chiv-chiv, karte pakharu,
___Ravanchya ghari, ale god vasaru
12
वेलीला शोभे फूल, स्त्रीला शोभे अपत्य,
___रावांचे नाव घ्यायला, बारश्याचे निमित्त
Velila shobhe phool, streela shobhe apatya,
___Ravanche nav ghyayla, barshyache nimitta
13
आनंदाचे कारंजे, मनी उडते थुई थुई,
___रावांच्या बाळाची, झाले मी आई
Anandache karanje, mani udate thui thui,
___ravanchya balachi, jhale mi aai
14
मखमली हिरवळीवर, पाखरांचा थवा,
___रावांच्या वंशात, लावला दीप नवा
Makhmali hiravalivar, pakharancha thava,
___Ravanchya vanshat, lavla deep nava
15
बाळराजाच्या चाहूलीने, दरवळला परीसर,
___रावांच्या साथीने, जीवन होईल सफल
Baal rajachya chahuline, daravalala parisar,
___Ravanchya sathine, jivan hoil safal
16
गणपती बाप्पाकडे बाळासाठी, केला होता नवस,
___रावांसह साजरा करते, बारश्याचा दिवस
Ganpati Bappakade balasathi, kela hota navas,
___Ravansah sajra karte, barshyacha divas
17
हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी,
___रावांचे नाव घेते, बारश्याच्या दिवशी
Himalay parvatavar, barfachya rashi,
___ravanche nav ghete, Barashyachya divshi
18
फुलांइतकीच मोहक दिसते, गुलाबाची कळी,
___ रावांचे नाव घेते, बारश्याच्या वेळी
Phoolanitakich mohak disate, gulabachi kali,
___ravanche nav ghete, Barashyachya veli
19
स्वर्गाच्या नंदनवनात, सुवर्णाच्या केळी,
___रावांचे नाव घेते, बारश्याच्या वेळी
Swargachya nandanvanat, Suvarnachya keli,
___ravanche nav ghete, Barashyachya veli
20
प्रेमाने जमले, नातलग खूपच हौशी,
_____ रावांचे नाव घेते, बारश्याच्या दिवशी
Premane jamle, naatlag khupach haushi,
___ ravanche naav ghete, Barashyachya divashi
.
21
मोगऱ्याचा सुगंध, स्पर्धा करतो निशिगंधाशी,
___ चे नाव घेते, बारश्याच्या दिवशी
Mogaryacha Sugandh, spardha karato nishigandhashi,
___che nav ghete, Barashyachya divshi
22
गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी,
___रावांचे नाव घेते, बारश्याच्या दिवशी
Gokulasarkhe sasar, sare kase haushi,
___ravanche nav ghete, Barashyachya divshi
23
फुटता तांबड पूर्वेला, कानी येते भूपाळी,
___ रावांचे नाव घेते, बारश्याच्या वेळी
Futata tambad purvela, kani yete Bhupali,
___ravanche nav ghete, Barashyachya veli
24
कृष्णाच्या गायींना चरायला, हिरवे-हिरवे कुरण,
___रावांचे नाव घ्यायला, बारश्याचे कारण
Krushnachya gayinna charayala, hirve hirve kuran,
___ravanche nav ghyayala, Barashyache karan
25
सरस्वतीच्या मंदिरात, साहित्याच्या राशी,
___रावांचे नाव घेते, बारश्याच्या दिवशी
Saraswatichya mandirat, sahityachya rashi,
___ravanche nav ghete, Barashyachya divshi
26
गोपिकांना करते धुंद, कृष्णाची बासरी,
___ रावांचे नाव घेते, बारसे आहे सासरी
Gopikana karte dhund, Krishnachi basari,
___ ravanche naav ghete, Baarase aahe sasari
27
बारश्याला नेसली, साडी पाचवारी,
___ व माझी जोडी, आहे सगळ्यांत भारी
Barashyala nesli, sadi paach vaari,
___ va mazhi jodi, aahe saglyant bhaari
28
निसर्गरूपी आकाशाला, सूर्यरूपी माळी,
___रावांचे नाव घेते, बारश्याच्या वेळी
Nisargaroopi akashala, suryaroopi maali,
___ravanche naav ghete, Barashyachya veli
29
सासूबाई आहेत सुगरण, सासरेबुवा आहेत हौशी,
___चे नाव घेते, बारश्याच्या दिवशी
Sasubai aahet sugaran, sasrebuva aahet haushi,
___che naav ghete, Barashyachya divashi
30
सर्वजण एकत्र जमलो, म्हणून आजचा दिवस खास,
___रावांचे नाव घेण्याची, लागली मला आस
Sarv jan ekatra jamlo, mhanun aajcha divas khas,
___ravanche naav ghenyachi, lagli mala aas
.
31
सासर आहे छान, सासू आहे हौशी,
___रावांचे नाव घेते, बारश्याच्या दिवशी
Sasar aahe chhan, sasu aahe haushi,
___ravanche naav ghete, Barashyachya divashi
32
जमले सगळे नातीगोती, आमच्या या घरात,
___रावांचे नाव घेते, आनंदाच्या भरात
Jamle sagle naatigoti, aamchya ya gharat,
___ravanche naav ghete, anandachya bharat
33
कुबेराच्या भांडारात, हिरे-माणकांच्या राशी,
___रावांचे नाव घेते, बारश्याच्या दिवशी
Kuberachya bhandarat, hire-manakyanchya raashi,
___ravanche naav ghete, Barashyachya divashi
34
जळगावात पिकतात, गोड गोड केळी,
___रावांचे नाव घेते, बारश्याच्या वेळी
Jalgaonat piktaat, god god keli,
___ ravanche nav ghete, Barashyachya veli
35
हवा होता तसाच मिळाला, नवरा मला हौशी,
___ रावांचे नाव घेते, बारश्याच्या दिवशी
Hava hota tasach milala, navra mala haushi,
___ ravanche nav ghete, Barashyachya divshi
36
भ्रमर करतो गुंजारव, मधाने भरतो पोळी,
___रावांचे नाव घेते, बारश्याच्या वेळी
Bhramar karto gunjarav, madhaane bharto poli,
___Ravanche nav ghete, Barashyachya veli
37
हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी,
___रावांचे नाव घेते, बारश्याच्या दिवशी
Hatat ghatalya bangadya, galyat ghatali thushi,
___ravanche nav ghete, Barashyachya divshi
38
चांदीच्या दिव्यात लावली, तुपाची वात,
___रावांचे नाव घेत करते, बारश्याला सुरूवात
Chandichya divyat lavli, tupachi vaat,
___ ravanche naav ghet karte, Barashyala survaat
39
आयुष्याच्या करंजीत, प्रेमाचे सारण,
___रावांचे नाव घेते, बारश्याचे कारण
Ayushyachya karanjit, premache saaran,
___ ravanche naav ghete, Barashyache kaaran
40
मोत्यांची माळ, सोन्याचा साज,
___ रावांचे नाव घेते, बारसे आहे आज
Motyanchi maal, sonyacha saaj,
___ravanche nav ghete, Baarase ahe aaj
41
उगवला सूर्य, मावळला शशी,
___रावांचे नाव घेते, बारश्याच्या दिवशी
Ugavala surya, mavalala Shashi,
___ravanche nav ghete, Barashyachya divshi
Note: ___ च्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.
नमस्कार मंडळी!
तुमच्या कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची आहे. तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटले हे खालील comment box मधून नक्की कळवा. आणि हो… आवडले असतील तर लगेच Share करा बरं !
आम्हाला नवनवीन उखाणे घेऊन येण्यासाठी असेच प्रोत्साहन देत रहा. तुम्हाला उखाण्यांसाठी एखादा भन्नाट विषय सुचतोय का? मग झट्कन खालील comment box मध्ये लिहा ना!